कोल्हापूर - कोल्हापूरकरांना येत्या काही वर्षात पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा होणार आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत कोकणातील दाभोळपासून कर्नाटकातल्या बंगळुरूपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.
कोल्हापूरकरांना काही वर्षातच मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा- खासदार संभाजीराजे - raje
राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कोल्हापूरसाठी आग्रह धरल्यावर केंद्र सरकारने या योजनेतील एक टप्पा कोल्हापूरला देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार आता कोल्हापूरकरांना निम्म्या किमतीत गॅस मिळणार आहे.
विशेष म्हणजे राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कोल्हापूरसाठी आग्रह धरल्यावर केंद्र सरकारने या योजनेतील एक टप्पा कोल्हापूरला देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार आता कोल्हापूरकरांना निम्म्या किमतीत गॅस मिळणार आहे.
६ मार्चपासून या योजनेचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार जोडण्या देण्यात येणार असून येत्या काही वर्षांत जवळपास ४० हजार जोडण्या कोल्हापूरमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. २०२३ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून कोल्हापूर शहरानंतर जिल्ह्यातील इतर शहरांना आणि गावांनाही पाइपलाईनद्वारे गॅस पुरवला जाणार आहे.