महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राऊत यांचा भाजपकडून निषेध; हाळवणकरांच्या 'त्या' वक्तव्यावर मात्र 'नो कमेंट्स' - कोल्हापूर भाजप न्यूज

संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये 'माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा,' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल कोल्हापुरात भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

संजय राऊत यांचा निषेध
संजय राऊत यांचा निषेध

By

Published : Jan 16, 2020, 4:42 PM IST

कोल्हापूर- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटले आहेत. राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये 'माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा,' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रसिद्धीसाठी हापापलेल्या राऊतांची वेळ भरली असल्याचे म्हणत त्यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

राऊत यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

हेही वाचा - संजय राऊतांचे I AM सॉरी ! इंदिरा गांधींबद्दलचे विधान घेतले मागे

दरम्यान, कोल्हापुरातील भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज म्हणने' चुकीचे नसल्याचे वक्तव्य केले होते. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे समर्थन हाळवणकर यांनी केले होते. त्यांचे ते वैयक्तिक वक्तव्य आहे. त्याबाबत आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही, असे कोल्हापूर भाजप अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या भाजपकडून हाळवणकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले.

ABOUT THE AUTHOR

...view details