महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबाबाई किरणोत्सव सोहळा : चौथ्या दिवशी देवीच्या मूर्तीच्या कंबरेपर्यंत पोहोचली सूर्यकिरणे

दक्षिणायनाच्या आजच्या चौथ्या दिवशी मावळत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशाची तीव्रता कमी असल्याने, ती देवीच्या कमरेपर्यंत पोहोचू शकली. हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मंदिर आणि परिसरात मोठी गर्दी केली होती.

अंबाबाई किरणोत्सव सोहळा : चौथ्या दिवशी देवीच्या मूर्तीच्या कंबरेपर्यंत पोहोचली सूर्यकिरणे

By

Published : Nov 11, 2019, 11:06 PM IST

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा दक्षिणायन किरणोत्सव सध्या सुरू आहे. हा किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मंदिर आणि परिसरात मोठी गर्दी केली होती. आज सायंकाळी ५.४७ मिनिटांनी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंतच पोहोचली.

दक्षिणायनाच्या आजच्या चौथ्या दिवशी मावळत्या सूर्यकिरणांच्या प्रकाशाची तीव्रता कमी असल्याने, ती देवीच्या कमरेपर्यंत पोहोचू शकली. परंपरेनुसार 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा सुरु होतो. मात्र, किरणोत्सवापूर्वी एक दिवस आणि नंतर एक दिवस अभ्यास केला जात असल्याने आता पाच दिवस किरणोत्सव होतो आहे.

हा किरणोत्सव पाहण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून मंदिराबाहेर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : संभाजीराजेंनी केबीसी मालिकेवर व्यक्त केला संताप; वाहिन्यांनाही सेन्सॉरशीप लागू करण्याची केली मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details