महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur Accident : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात; कार दुचाकींच्या धडकेत एक ठार तर नऊ जण जखमी - कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग

Kolhapur Accident : ज्योतिबाचं दर्शन घेऊन कोल्हापूर शहरात येणाऱ्या भाविकांच्या कारनं रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात दुकाचीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या अपघातातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Kolhapur Accident
संपादित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 10:11 AM IST

कोल्हापूर Kolhapur Accident : भरधाव कार आणि दुचाकींच्या भीषण अपघातात एक जण ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाल्यानं मोठी खळबळ उडाली. पंकज जाधव असं या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचं नाव आहे. ही घटना कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंबोवाडीजवळ शनिवारी सायंकाळी घडला आहे. ज्योतिबा दर्शनावरुन परतणाऱ्या कारनं रिक्षा आणि दोन दुचाकींना विचित्र धडक दिल्यानं हा अपघात ( Kolhapur Accident ) झाल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. या भीषण अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या अपघातातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जोतिबाचं दर्शन घेऊन येत होते भाविक :अहमदनगर येथील बिडगर कुटुंब हे जोतिबाचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात आलं होतं. ज्योतिबांचं दर्शन घेऊन ते कारमधून कोल्हापूरच्या दिशेनं येताना आंबेवाडी इथं असलेल्या रेडेडोहजवळ सुंदर बिडगर यांचं कारवरील नियंत्रण सुटलं. यावेळी कारनं पन्हाळ्याच्या दिशेनं निघालेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटून रस्त्यावरून खाली पडली. तर याचवेळी कार पुढं जाऊन दोन दुचाकींना उडवत बाजूला जाऊन उलटली. या अपघातात दुचाकीवरील पंकज जाधव यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर कार, रिक्षा आणि दोन्ही दुचाकींवरील 11 जण जखमी झाल्याची माहिती सीपीआर रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

नागरिकांनी घेतली घटनास्थळी धाव :कारनं रिक्षा आणि दुचाकींना धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्यानं घटनास्थळावर मोठा आक्रोश सुरु झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी नागरिकांना 108 रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला. या भीषण अपघातात चारही वाहनांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत आणि जखमींची नावं पुढील प्रमाणं :पंकज जाधव (वय 20, रा. दरेवाडी, ता. पन्हाळा) असं मृताचं नाव आहे. तर कारमधील सुंदर निवृत्ती बिडगर (वय 40), शांता सुंदर बिडगर (वय 36), गीतेश सुंदर बिडगर (वय 10, रा. डिग्रज, ता. संगमनेर, जि. अहमदनगर), रिक्षातील रुचिरा अभिजीत आंबरोसकर (वय 40, रा. मुंबई), दुचाकीवरील गणेश अमर बजागे (वय 21, रा. पडळवाडी, ता. करवीर), मझहर सफी अहमद (वय 40), अल्मास मझहर (वय 35, दोघे रा. परीट गल्ली, शुक्रवार पेठ, कोल्हापूर), रिक्षाचालक मुस्ताक अजीज शेख (वय 52, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) हे जखमी झाले. यातील रुचिरा आंबरोसकर आणि शांता बिडगर यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सीपीआर रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Kolhapur Accident : शीतपेय घेऊन जाणारा कंटेनर पलटी; काही क्षणातच नागरिकांकडून कंटेनर रिकामा
  2. kolhapur accident : चंदगड येथे भीषण अपघातात दोन जीवलग मित्रांना ट्रकने चिरडले

ABOUT THE AUTHOR

...view details