कोल्हापूर - जिल्ह्यातील १० मतदारसंघापैकी २ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार हसन मुश्रीफ, तर चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश पाटील आहेत. दोघेही शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे दोघेही शरद पवार यांच्या सोबतच राहणार यात काहीच शंका नसल्याचे राजकीय विश्लेषक रवी कुलकर्णी यांनी सांगितले.
कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार शरद पवारांसोबत - हसन मुश्रीफ कागल राष्ट्रवादी आमदार
मुंबईमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना एकत्र करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तरीही भाजप आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करीत आहे. अजित पवारांसोबत अनेक आमदार असल्याचेही वारंवार सांगितले जात आहे. मात्र, हे सर्व बहुमत चाचणीवेळी स्पष्ट होईल.
मुंबईमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या आमदारांना एकत्र करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तरीही भाजप आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करीत आहे. अजित पवारांसोबत अनेक आमदार असल्याचेही वारंवार सांगितले जात आहे. मात्र, हे सर्व बहुमत चाचणीवेळी स्पष्ट होईल. राज्यातील राष्ट्रवादीच्या एकूण आमदारांमध्ये कोल्हापुरातील २ आमदारांचा समावेश आहे. हसन मुश्रीफ यावेळी सलग पाचव्यांदा विधानसभेत जाणार आहेत. गेले अनेक वर्षे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असणारे राजेश पाटील हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या दोघांचाही अजित पवारांसोबत जाण्याचा काहीही संबंध येणार नसल्याचे रवी कुलकर्णी यांनी सांगितले.