कोल्हापूर : जिल्ह्यात केवळ ४९ कोरोनाबाधित तर पाच दिवसात 5 जणांचा मृत्यू - कोल्हापूर कोरोना
कोल्हापूर जिल्ह्यात नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून आजपर्यंत पाच दिवसांत 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा कमी होत चालली असून गेल्या 5 दिवसांत ही संख्या स्थिर राहिली आहे.
कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारीपासून आजपर्यंत पाच दिवसांत 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा कमी होत चालली असून गेल्या 5 दिवसांत ही संख्या स्थिर राहिली आहे. सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता केवळ 49 वर आली आहे. आज 20 नवे रुग्ण आढळले आहेत तर 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आकडेवारीनुसार एकूण 49 हजार 589 रुग्णांपैकी 47 हजार 830 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 1710 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या आकडेवारी एक नजर -
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
आजरा- 873
भुदरगड- 1231
चंदगड- 1217
गडहिंग्लज- 1490
गगनबावडा- 148
हातकणंगले- 5312
कागल- 1669
करवीर- 5681
पन्हाळा- 1866
राधानगरी- 1245
शाहूवाडी- 1356
शिरोळ- 2509
नगरपरिषद क्षेत्र- 7475
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15129
इतर जिल्हा व राज्यातील 2388 असे मिळून आत्तापर्यंत एकूण 49 हजार 589 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण 49 हजार 589 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 47 हजार 830 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 1710 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ 49 इतकी आहे.
वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
1 वर्षांपेक्षा लहान - 57 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1882 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3475 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 26343 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 14226 रुग्ण
71 वर्षांपेक्षा जास्त - 3606 रुग्ण