महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wall Collapse In Kolhapur : खासबाग मैदानाची संरक्षक भिंत कोसळून महिलेचा मृत्यू - Khasbag Maidan Wall Collapsed

कोल्हापुरात गेल्या दहा बारा दिवसापांसून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरातील खासबाग मैदानाची संरक्षण भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Woman dies due to wall collapse
भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

By

Published : Jul 25, 2023, 10:47 PM IST

कोल्हापूर: गेल्या दहा बारा दिवसापांसून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. तर संततधार पावसामुळे खासबाग मैदानाची संरक्षक भिंत स्वच्छतागृहावर कोसळली. यात महिलेचा मृत्यू झाला आहे. अश्विनी आनंद यादव (वय ४५ भोसलेवाडी रोड, कसबा बावडा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर संध्या प्रशांत तेली (३०,रा.वडणगे,ता करवीर) ही महिला गंभीर जखमी झाली असून, उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.


अशी घडली घटना : आज केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रमासाठी आलेल्या दोन महिला या स्वच्छतागृहात गेल्या असता, बाजूलाच असलेल्या खासबाग मैदानाची संरक्षण भिंत अचानक कोसळल्याने या दोन्ही महिला आतच अडकल्या. एका लहान मुलीच्या ओरडण्याने या दुर्घटनेची माहिती मिळाली. यानंतर तात्काळ अग्निशामन दलाची तुकडी आणि ॲम्बुलन्स दाखल झाली. तसेच अडकलेल्या महिलांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. या दोन्ही गंभीर जखमी महिलांना सुरक्षितरित्या बाहेर काढून, रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच अश्विनी आनंदा यादव यांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्यावतीने 33 नागरिकांचे स्थलांतर: जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. महापालिकेच्यावतीने आज शहरातील 33 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. यामध्ये विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत पंचगंगा तालीम जामदार क्लब परिसरातील 8 कुटुंबांतील 32 नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले. हे नागरीक आपल्या नातेवाईकांच्याकडे राहण्यासाठी गेले आहेत. विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत सुतारवाडा जवळील एका कुटुंबातील एका नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांना चित्रदुर्गमठ या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. आज अखेर 21 कुटुंबातील 84 नागरीकांचे महापालिकेच्यावतीने स्थलांतर करण्यात आले आहे.


हेही वाचा -

  1. Electrocution Case : दिल्ली रेल्वे स्थानकावर वीजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
  2. Dengue Fever: चिखली तालुक्यात डेंग्यू सदृश्य तापाची साथ; भानखेडमध्ये दोन मुलांसह गर्भवती महिलेचा मृत्यू, तर सवणा गावातही तापाचे थैमान
  3. Mumbai Crime News: उशीच्या सहाय्याने केला मालकिणीचा खून; मोलकरणीच्या प्रियकरासह मुलाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details