महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केडीसीसी बँकेच्या वेबसाइट आणि मोबाईल बँकिंगचे अनावरण; आता ग्राहकांना 'या' सुविधांचा लाभ घेता येणार - kolhapur kdc bank

बँकेच्या केडीसीसी मोबाईल बँकिंग आणि अद्ययावत वेबसाइटचे लॉन्चिंग डॉ. थोरात यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी मोबाईल बँकिंगमुळे ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार असून त्यांनी आता याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

केडीसी बँक
केडीसी बँक

By

Published : May 2, 2020, 4:02 PM IST

कोल्हापूर - सर्व सुविधांनी युक्त शहरी जीवन आणि सुविधांपासून वंचित ग्रामीण जीवन, यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. मात्र, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शहरात मिळणाऱ्या सुविधा गावातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवून शहर आणि गाव ही दरीच कमी केली आहे. शिवाय आता मोबाईल बँकिंगमुळे अनेक सुविधा नागरिकांना मिळणार आहेत, असे गौरवोद्गार नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी काढले.

बँकेच्या केडीसीसी मोबाईल बँकिंग आणि अद्ययावत वेबसाइटचे लॉन्चिंग डॉ. थोरात यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी मोबाईल बँकिंगमुळे ग्राहकांना अनेक सुविधा मिळणार असून त्यांनी आता याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

या डिजिटल सुविधा मिळणार -

जिल्हा बँकेच्या केंद्र कार्यालयासह सर्वच म्हणजे 191 शाखांमधून KDCC MOBILE BANK या ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा मिळणार आहेत.

1) जिल्ह्यातील आठ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांना शाखेत न येता डिजिटल व्यवहार करता येणार.

2) खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, खाते उतारा पाहणे, चेकबुक मागणी, मुदतबंद व रिकरिंग ठेव खाते उघडणे, बँकेतर्गत इतर खात्यामध्ये रक्कम वर्ग आदि व्यवहार करता येणार.

3) NEFT व IMPS या सुविधांद्वारे इतर बँकांच्या ग्राहकांच्या खात्यावर सुद्धा रक्कम वर्ग करता येणार आहे.

4) UPI आणि Bharat Bill Payment System याद्वारे मोबाईल फोन, वीज बील, पाणी बील, मोबाईल व डिश टिव्ही रिचार्ज रक्कमा अदा करता येणार.

5) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह ग्राहक, नोकरदार व इतर घटकांना या सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार.

यावेळी खासदार संजय मंडलिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details