महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्नाटक सरकारने कोगनोळी टोल नाक्यावर पुन्हा सुरू केला 'कोरोना चेक पोस्ट' - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

महाराष्ट्रात गेल्या एका आठवड्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. दररोजच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता पाच हजारांवर ही संख्या पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध घातले जात आहेत. अनेक ठिकाणी उद्या रविवारी जनता कर्फ्युची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या कर्नाटक राज्याने कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची तपासणी करायला सुरुवात केली आहे.

Kolhapur Kognoli Toll Naka Corona Check Post
कोल्हापूर कोगनोळी टोल नाका कोरोना चेक पोस्ट

By

Published : Feb 20, 2021, 7:44 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून पुन्हा एकदा चेक पोस्ट सुरू करण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. केंद्र सरकारचे याबाबतचे कोणतेही आदेश नसताना महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रत्येक गाडीचे आजपासून चेकिंग सुरू झाले आहे. येथील दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका येथे हा चेक पोस्ट सुरू करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी सुद्धा तैनात केले आहेत.

कोल्हापूर : कोगनोळी टोल नाका कोरोना चेक पोस्ट

कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी काढले परिपत्रक

महाराष्ट्र व केरळ या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने कर्नाटकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केरळ व महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून तसेच, त्यांच्याकडे कोव्हिड निगेटीव्हचे प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रकच कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी काढले आहे. त्यानंतर आता कागल येथील कोगनोळी टोल नाका येथील दोन्ही राज्यांच्या सीमेवर आता प्रत्येक वाहनधारकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिवाय, येथे मोठा मंडपही घालण्यात आला असून कर्मचारी सुद्धा तैनात केले आहेत.


महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रसार

महाराष्ट्रात गेल्या एका आठवड्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. दररोजच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता पाच हजारांवर ही संख्या पोहोचली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध घातले जात आहेत. अनेक ठिकाणी उद्या रविवारी जनता कर्फ्युची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शेजारीच असलेल्या कर्नाटक राज्याने सुद्धा कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची तपासणी करायला सुरुवात केली आहे.


महाराष्ट्रात या ठिकाणी एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या

मुंबई पालिका - 823
ठाणे पालिका - 138
नवी मुंबई पालिका - 126
कल्याण डोंबिवली पालिका - 146
नाशिक पालिका - 176
अहमदनगर - 88
जळगाव - 110
पुणे - 211
पुणे पालिका - 535
पिंपरी-चिंचवड पालिका - 259
औरंगाबाद पालिका - 124
अकोला पालिका - 127
अमरावती - 132
अमरावती पालिका - 623
यवतमाळ - 258
बुलढाणा - 105
नागपूर - 122
नागपूर पालिका - 630
वर्धा - 106

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details