कोल्हापूर : कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) डोळ्यासमोर ठेऊन निर्माण केलेला नवा वाद (Karnataka borderism) असल्याचा आरोप माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ (MLA Hasan Mushrif) आणि माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील (MLA Satej Patil) यांनी केला आहे. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकासमोर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून धरणे आंदोलन (Mahavikas Aghadi Dharne Movement) केले जात आहे. Latest news from Kolhapur
महाविकास आघाडीच्या नेत्याशी चर्चा करताना ईटीव्ही प्रतिनिधी आमदार पाटील यांचा हल्लाबोल :यावेळी मुश्रीफ तसेच सतेज पाटलांनी हा आरोप केला आहे. शिवाय चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनीसुद्धा कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
मिटकरींची जळजळीत प्रतिक्रिया :महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे. बसवराज बोम्मई यांच्या नवनवीन विधानामुळे हा वाद वाढत चालला आहे. महाविकास आघाडीचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून सीमावादाचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे. त्यावर एका ट्विटद्वारे बोम्मई यांनी माहिती दिली आहे की, कर्नाटक महाराष्ट्र सीमावादचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अमित शहा यांना कोणीही भेटले तरी काहीही फरक पडणार नाही. यामुळे आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. या विधानावर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) यांनी संताप व्यक्त केला आहे.
बोम्मईंना देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ : महाराष्ट्रातील जनतेला मूळ मुद्द्यांपासून दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय केला जात आहे. हा जो प्रयत्न सुरू आहे,त्यामागे पंतप्रधान मोदींचे तसेच अमित शहा व महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ( MLA Amol Mitkari Alleged on Devendra Fadnavis ) केला आहे. भाजपच्या दहशतीखाली असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे का गप्प आहेत? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
मिटकरींचे भाजपवर आरोप: भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे धास्ती लागली आहे. कारण भारत जोडो यात्रेमुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली आहे. आता काही दिवसांनी कर्नाटकात निवडणूका होणार आहेत. म्हणून अशा मुद्द्यांवर भाजप षडयंत्र करत आहे. भाजप या पक्षामुळे मूळ मुद्दे भरकटत आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.