कोल्हापूर - पावसाळा आला की सर्वांना नयनरम्य ठिकाणे, धबधबे, समुद्र किणारे, डोंगर दऱे फिरायचे असतात, पाहायचे असतात. प्रत्येक व्यक्तीला हे ठिकाण पाहण्याचा मोह होतोच. आता मोबाईलचा जमाना असल्यामुळे यामध्ये सेल्फी काढताना, व्हिडीओ काढताना पाण्यात बुडाला, मृत्यू झाला अशा घटना घडत असतात. मात्र, या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक नागरिक असूसलेला असतो. पाण्यात पोहायला, डोंगर दऱ्यामध्ये भटकायला सर्वांना आवडते. असाच कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. कोरोनाचे काही निर्बंध अल्यामुळे नागरिकांना हा तलाव खुनावतोय. मात्र, आनंद घेता येत नाही. अशी परिस्थिती सध्या आहे.
कळंबा तलाव 'ओव्हर फ्लो', कोल्हापूरकरांसाठी ड्रोन कॅमेऱ्यातले विहंगम दृष्य
कोल्हापूरकर कधी एकदा कळंबा तलाव 'ओव्हर फ्लो' होतो आणि तलावातून ओसंडून वाहत असलेल्या पाण्यामध्ये चिंब भिजून आनंद घेतो याचीच वाट पाहत असतात. कालच, कलंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तो आता ओसंडून वाहत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या सर्वांनाच घरी राहावे लागत आहे. असे, असले तरी त्या सर्वांसाठी कलंबा तलावाची नयनरम्य दृश्ये 'तौफिक मिरशिकारी' यांनी आपल्या ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपली आहेत.
'खास झलक कोल्हापूरकरांसाठी'
दरवर्षी लोक वर्षा पर्यटनासाठी अनेक ठिकाणी जात असतात. प्रत्येक पावसाळ्यात कोल्हापूरकरही कधी एकदा कळंबा तलाव 'ओव्हर फ्लो' होतो आणि तलावातून ओसंडून वाहत असलेल्या पाण्यामध्ये चिंब भिजून आनंद घेतो याचीच वाट पाहत असतात. कालच, कलंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तो आता ओसंडून वाहत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सद्या सर्वांनाच घरी राहावे लागत आहे. असे, असले तरी त्या सर्वांसाठी कलंबा तलावाची नयनरम्य दृश्ये 'तौफिक मिरशिकारी' यांनी आपल्या ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपली आहेत. याची एक खास झलक कोल्हापूरकरांसाठी.