कोल्हापूर - मंदिर आणि मशिदीमध्ये लोकांची मन तोडायला शिकवले जात नाही, तर मनं जोडायला शिकवले जाते. मात्र, राजकारण्यांनी याचे भांडवल केले आहे. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. अयोद्धेचा निकाल कसाही आला तरी आम्ही त्याचे स्वागत करू, असे मत मुस्लीम बोर्डींगचे कादर मलबारी यांनी व्यक्त केले आहे.
अयोद्धेबाबत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करू - कादर मलबारी - अयोद्धा निकालाविषयी कादर मलबारी
अयोद्धेचा निकाल कोणत्याही बाजूने लागला तरी त्याचे स्वागत करू. तसेच दसरा चौकात एकत्र जमून आनंद साजरा करू, असे ठरवले असल्याचे मलबारी यांनी सांगितले. त्यामुळे शाहूंच्या विचारांनी प्रेरीत असलेली शाहू नगरी नेहमीच राज्याला एक आदर्श घालून देत असते. तोच आदर्श महाराष्ट्रासमोर ठेऊ, असे कादर मलबारी म्हणाले.
![अयोद्धेबाबत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करू - कादर मलबारी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4998091-thumbnail-3x2-kolha.jpg)
कादर मलबारी
अयोद्धेबाबत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करू
न्यायालय अयोद्धेबाबत जो निर्यण देईल तो आम्हाला मान्य आहे. आमची नुकतीच बैठक झाली आहे. त्यामध्ये अयोद्धेचा निकाल कोणत्याही बाजूने लागला तरी त्याचे स्वागत करू. तसेच दसरा चौकात एकत्र जमून आनंद साजरा करू, असे ठरवले असल्याचे मलबारी यांनी सांगितले. त्यामुळे शाहूंच्या विचारांनी प्रेरीत असलेली शाहू नगरी नेहमीच राज्याला एक आदर्श घालून देत असते. तोच आदर्श महाराष्ट्रासमोर ठेऊ, असे कादर मलबारी म्हणाले.
Last Updated : Nov 8, 2019, 7:35 PM IST