कोल्हापूर- मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आयोजित केलेल्या न्यायिक परिषदेला सुरुवात झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज या परिषदेला सुरुवात झाली. या परिषदेला खासदार संभाजीराजे छत्रपती, श्रीराम पिंगळे, अॅड. आशिष गायकवाड, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, प्रा. जयंत पाटील, अॅड.रणजित गावडे, जयेश कदम, दिलीप पाटील, दिलीप देसाई हे सर्व उपस्थित आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी कोल्हापुरात न्यायिक परिषदेला सुरुवात
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. त्यानंतर सर्वच पातळीवरून मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच प्रमाणे आज कोल्हापुरात न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील वकिल सुद्धा उपस्थित राहिले आहेत.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर सर्वच पातळीवरून मराठा आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच प्रमाणे आज कोल्हापुरात न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत कोल्हापूर सह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील वकील सुद्धा उपस्थित राहिले आहेत.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरची लढाई तर केलीच आता न्यायालयीन लढाईसाठी अधिक बळकट होण्याची गरज आहे. त्यासाठीच कोल्हापुरात ही न्यायिक परिषद पार पडत आहे. मराठा आरक्षणाच्या या लढ्याचे केंद्र आता कोल्हापूर झाले आहे. कोल्हापुरातून या आरक्षणाच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रात आवाज उठवण्यासाठी व न्यायिक विचारविनिमय करण्यासाठी मराठा क्रांति मोर्चा, सकल मराठा समाजाच्या वतीने आज न्यायिक परिषद पार पडत आहे.