कोल्हापुरात जिजाऊ ब्रिगेडकडुन वाढीव वीज बिलांची होळी - kolhapur mahavitran news
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून या तीन महिन्यांची भरमसाठ वीज बिल आकारणी करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ शनिवारी जिजाऊ ब्रिगेडच्या पुढाकाराने मिरजकर तिकटी येथील चौकात वीज बिलांची होळी करण्यात आली.
कोल्हापूर- लॉकडाऊन काळात आलेली वाढीव घरगुती वीज बिलाविरोधात शनिवारी जिजाऊ ब्रिगेडने निषेध केला. वाढीव बिले महावितरणने माफ करावीत, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिजाऊ ब्रिगेडने दिला. यावेळी मिरजकर तिकटी येथे वीज बिलांची होळी करण्यात आली. महिलांनी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कोरोना काळात सर्व लोकांंची मोठी आर्थिक ओढाताण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून या तीन महिन्याची भरमसाठ वीज बिल आकारणी करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ शनिवारी जिजाऊ ब्रिगेडच्या पुढाकाराने मिरजकर तिकटी येथील चौकात वीज बिलांची होळी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. तसेच वीज बिल न भरण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या वैशाली पाटील, माधुरी जाधव, वैशाली महाडिक, अर्पिता रावडे, निता देशमुख, सीमा महेकर, माया चोपडे, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.