महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayaprabha Studio In Kolhapur : जयप्रभा स्टुडिओचा वाद चिघळला, आंदोलकांकडून खरेदीदाराच्या ऑफिसवर शाई फेक - जयप्रभा स्टुडिओचा वाद चिघळला

अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाकडून जयप्रभा स्टुडिओ ( Jayaprabha studio land Sale at Kolhapur ) समोर सकाळपासून साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आक्रमक झालेल्या कोल्हापूरकर आणि काही संघटनांनी जयप्रभा स्टुडिओ खरेदी केलेल्या खरेदीदार रोनक शहा गुंडेशा व पोपट शहा गुंडेशा यांच्या भवानी मंडप परिसरात असलेल्या ऑफिसवर शाई फेक केली.

Jayaprabha Studio In Kolhapur
जयप्रभा

By

Published : Feb 13, 2022, 3:05 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ संदर्भात ( Jayaprabha studio land Sale at Kolhapur ) चालू असलेल्या प्रकरणात अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाकडून जयप्रभा स्टुडिओ समोर सकाळपासून साखळी पद्धतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र, आक्रमक झालेल्या कोल्हापूरकर आणि काही संघटनांनी जयप्रभा स्टुडिओ खरेदी केलेल्या खरेदीदार रोनक शहा गुंडेशा व पोपट शहा गुंडेशा यांच्या भवानी मंडप परिसरात असलेल्या ऑफिसवर शाई फेक केली. मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडने ही शाई फेक केली आहे. त्यामुळे आता हे आंदोलन चिघळत असल्याचे दिसून येत आहे. जयप्रभा स्टुडिओ लवकरात लवकर परत करावा, अशी मागणी त्यांनी केली. घटना कळताच जुना राजवाडा पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाकडून बेमुदत साखळी पद्धतीचे उपोषण


कोल्हापूरकरांची अस्मिता आणि शान असलेल्या आणि भालजी पेंढारकर आणि हजारो चित्रपटांचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओ हे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. यातील काही इमारतींना हेरिटेज वास्तू म्हणून देखील घोषित करण्यात आले आहेत. स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावे असलेली ही जागा गेल्या दोन वर्षापूर्वी कोरोना सारखा हाहाकार असताना गुप्त पद्धतीने श्री महालक्ष्मी स्टुडीओज एल.एल.पी. या फर्मने विकत घेतली असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे दोन मुलांसह अन्य व्यापाऱ्यांची भागीदारी देखील आहे. यामुळे आता कोल्हापुरात जयप्रभा स्टुडीओ साठी पुन्हा संघर्ष पेटलेला आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाच्यावतीने जयप्रभा स्टुडिओसमोर सध्या बेमुदत साखळी पद्धतीचे उपोषण सुरू करण्यात आले आहे. तर दुसरीकडे आक्रमक झालेल्या संघटनानी ही जागा खरेदी केलेल्या खरेदीदार रोनक शहा गुंडेशा व पोपट शहा गुंडेशा यांच्या भवानी मंडप परिसरात असलेल्या दुकानावर आज शाई फेक केली आहे. यामुळे आता हे आंदोलन चिघळले आहे. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत जयप्रभा स्टुडिओ लवकरात लवकर पुन्हा सुरू करावा. अन्यथा त्यापेक्षा तीव्र रित्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. दरम्यान ही माहिती कळताच जुना राजवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details