महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jaiprabha Studio : जयप्रभा स्टुडिओ राज्य सरकार ताब्यात घेणार; कलाकारांकडून जल्लोष - Jaiprabha Studio of Kolhapur

राज्य सरकारने कोल्हापुरातील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेने ताब्यात घ्यावा अशा प्रकारचा आदेश काढला आहे. यानंतर कोल्हापूरकरांनी आणि कलाकारांनी आज (शनिवारी) जयप्रभा स्टुडिओच्या दारात आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना कार्यकर्ते, चित्रपट कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी एकत्र येत हा आनंद साजरा केला.

Jaiprabha Studio
जयप्रभा स्टुडिओ

By

Published : Aug 5, 2023, 8:42 PM IST

जयप्रभा स्टुडिओबद्दल मान्यवरांची प्रतिक्रिया

कोल्हापूर:कोरोना काळात भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर आले होते. यानंतर कलाकारांनी आक्रमक होत साखळी उपोषण सुरू केले होते. यानंतर तब्बल 1 वर्षानंतर उशिरा का होईना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे चित्रपट सृष्टीचा चालता-बोलता इतिहास वाचला, अशी प्रतिक्रिया कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी दिली आहे. कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होता. जयप्रभा स्टुडिओची जागा कोल्हापूरची अस्मिता असून, कोल्हापूरवासीय आणि कलाकारांच्या भावनांचा अनादर होणार नाही. स्टुडिओच्या जागेचा प्रश्न मार्गी लावून विकासासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली होती.

स्टुडिओसाठी सुचविले पर्याय:राजेश क्षीरसागर त्यांच्या प्रयत्नास यश आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाने या जागेबाबत निर्णय घेण्याचे दोन पर्याय कोल्हापूर महानगरपालिकेस दिले आहे. यामध्ये पर्याय एक नुसार कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या जागेच्या मोबदल्यात श्री. महालक्ष्मी स्टुडिओ एल.एल.पी.फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन ही जागा ताब्यात घ्यावी. अन्यथा पर्याय दोन नुसार पर्याय एक प्रमाणे कार्यवाही शक्य नसल्यास या जागेतील हेरीटेज जागेच्या संपादनाच्या मोबदल्यात उर्वरित जागेत जमीन मालकास बांधकामास परवानगी दिली जावी. यानंतर विकास हस्तांतरणीय हक्क (TDR) उपलब्ध करून देण्यात यावा, असा निर्णय ३ ऑगस्ट रोजी दिला आहे. यामुळे जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा विषय निकाली लागला आहे.

काँग्रेस नेत्यांकडून वेगळे वळण देण्याचा प्रयत्न:स्टुडिओचा प्रश्न निकाली लागण्याच्या स्थितीत असताना यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही कॉंग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर आणि महालक्ष्मी एल.एल.पी. फर्म मध्ये कायदेशीर व्यवहार झाला आहे. भारतीय कायद्यानुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या सज्ञान व्यक्तीला जागा खरेदी-विक्री करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अशी सत्य परिस्थिती असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदनामी करण्याच्या हेतूनेच जनता आणि कलाकारांमध्ये गैरसमज पसरविण्याचा डाव आखला गेला; मात्र आता या जागेबाबत शासनाने दिलेला निर्णय हा जनभावनांचा विजय आहे. यापुढेही जाऊन कोट्यावधींचा निधी या स्टुडिओस उपलब्ध करून या जागेत चित्रिकरणासाठी व कलाकारांसाठी आवश्यक बाबी पुरवून स्टुडिओचा विकास केला जाईल, असे राजेश क्षीरसागर म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?कोल्हापुरातील सर्वांत जुना आणि हजारो चित्रपटांचा साक्षीदार असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याची माहिती समोर आली होती. ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्या विरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा कोरोना काळात दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले. ही जागा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे दोन सुपुत्र आणि आणखी 8 जण मिळून भागीदारीमध्ये श्री. महालक्ष्मी स्टुडिओ एल.एल.पी. फर्म या नावाने खरेदी केल्याचे समोर आले होते. यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून तब्बल दीडशेहून अधिक दिवस साखळी उपोषण करण्यात आले होते. दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार ही जागा ताब्यात घेऊन संबंधित फर्मला दुसरी जागा द्यावी आणि जयप्रभा स्टुडिओचा विकास करावा, असे पत्र दिले होते. यानंतर तब्बल वर्षभराच्या लढ्यानंतर अखेर कलाकारांच्या लढ्याला यश मिळाले आहे.

हेही वाचा:

  1. Jayprabha Studio Issue : '26 हजार रुपये घ्या, अन् जयप्रभा स्टुडिओ सोडा'; शिवसेनेचे राजेश क्षीरसागरांना आव्हान
  2. Agitation to save Jayaprabha Studio : जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कलाकार आक्रमक, पंचगंगा नदीत उड्या घेत केले अर्धनग्न आंदोलन
  3. Jayaprabha Studio Kolhapur : जयप्रभा स्टुडिओसाठी कलाकार आक्रमक; छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details