कोल्हापूर - कोरोनामुळे सणांवर बंदी आल्याने कोल्हापुरी गुळाच्या मागणीत घट झाली आहे. तर उत्पादनात झालेली घट, त्यात मागणी नसल्याने गुळाच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याचे सध्या चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुळाचा प्रतिक्विंटल दर हा 2700 ते 2800 रुपये तर उच्च प्रतीचा गुळाचा दर हा 3800 ते 4000 रुपयांवर आला आहे. त्यामुळे गुळ उत्पादक शेतकरीदेखील अडचणीत असून गुळाला अपेक्षित मागणी नसल्याने गुळाचा दर मोठ्या प्रमाणावर खाली आली आहे.त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह गुऱ्हाळ मालकांना सोसावा लागणार आहे.
अपेक्षित मागणीही नाही
कोल्हापुरी गूळ हा जगप्रसिद्ध आहे. परजिल्ह्यासह, परराज्यात आणि देशभरात कोल्हापुरी गुळाला चांगली मागणी आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुळाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. 2019मध्ये गुळाचा दर हा प्रतिक्विंटल 3500 ते 3600 आणि उच्च प्रतीचा गूळ 4500 ते 4800 रुपयापर्यंत होता. यावर्षी मात्र याच गुळाच्या दरामध्ये सरासरी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मोठी घसरण झाल्याने हा दर प्रतिक्विंटल 2700 ते 2800 रुपयापर्यंत आला आहे. तर उच्च प्रतीच्या गुळाला किमान 3800 ते 4000पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळ गूळ उत्पादक हवालदिल झाल्याचे सध्या चित्र आहे. एकूणच गुळाचे उत्पादन कमी आहे. त्यातच अपेक्षित मागणीदेखील नाही. शिवाय गुजरात, कर्नाटक या पर राज्यातून होणाऱ्या गुळाचा मागणीदेखील घटली आहे. याचा एकंदरीत परिणाम हा दरावर होत असंल्याची माहितीही अडत दुकानदारांनी दिली आहे.
ठोस निर्णय नाही
गुळ उत्पादनासाठी येणारा खर्चा एवढाही दर मिळत नसल्याने गूळ उत्पादक शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. त्यातच मागणी नसल्याने मोठी अडचण या उत्पादक शेतकर्यांसमोर निर्माण झाली आहे. एकंदरीत पूरस्थिती आणि अवकाळी पाऊस यामुळेही ऊसाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. त्यातच गुऱ्हाळ घरावर कामगार वर्गाचा तुटवडा असल्याने गूळउत्पादक शेतकऱ्यासमोर अडचण असते. उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाएवढाही यावर्षी दर मिळत नसल्याचे गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. एकदंरीत गूळ उद्योगाकडे आजपर्यंत गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे गूळ उत्पादकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच राहिल्या आहेत. कोल्हापूरचा गूळ हा जगप्रसिद्ध असूनही त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. गूळ प्रक्रियायुक्त शेतीमाल असल्याने याला हमी भाव देता येत नाही. मात्र याचा तोटा गूळ उत्पादक शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळच शेतीमालाच्या धरतीवर गुळाला दर्जानुसार हमी भाव देण्याची मागणी देखील या निमित्ताने होत आहे.
कोल्हापुरी गुळाच्या नावाखाली कर्नाटकी गुळाची विक्री
अनेक ठिकाणे कोल्हापुरी गुळाची ओळख घेऊन कर्नाटक गुळाची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोल्हापूर गुळाच्या विक्री व त्याचा परिणाम जाणवत आहे. जिल्ह्यात सुमारे १०००पेक्षा अधिक गुऱ्हाळघरे आहेत.
जत्रा-यात्रा बंदीचा गुळावर परिणाम
कोरोणाच्या संकटामुळे देशात जत्रा-यात्रा साजऱ्या करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या गुळावर त्याचा परिणाम जाणवत आहे. तर सण साजरे करण्यावर मर्यादा आल्याने त्याचा परिणामदेखील गूळ विक्रीवर झाल्याचे दिसून येत आहे.
ऊस उत्पादनाचे प्रमाण वाढले
यंदा उत्तर प्रदेश, कर्नाटकसह सर्वच राज्यांत उसाचे बंपर पीक असल्याने गुळाचे उत्पादनही वाढले आहे. त्याचा परिणाम गुजरात, राजस्थान मार्केटमध्ये गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणाम कोल्हापूर मार्केटवर दिसत असून, महिन्याभरात दरात एक हजारांची घसरण झाली आहे.
दरात सातत्याने घसरण
कोल्हापूरसह राज्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने उसाचे पीक चांगले आहे. त्यामुळे साखर व गुळाचे उत्पादनही मुबलक होणार हे निश्चित आहे. लॉकडाऊनमुळे कोल्डस्टोरेजमधील गूळ संपल्याने हंगामाच्या सुरुवातीला गुळाला चांगली मागणी होती. त्यामुळे दरही चढा राहिला होता. किमान ४५०० ते कमाल ५५०० रुपये क्विंटल दर होता. मात्र, हंगाम पुढे जाईल तशी दरात घसरण होत गेली. गेली दोन दिवस एक किलो बॉक्सचा दर सरासरी ३४०० रुपये क्विंटलपर्यंत आला आहे. पाच व दहा किलो रव्यांचा दर सरासरी ४ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.यंदा उसाची एफआरपी वाढल्याने गूळही तेजीत राहील, असा अंदाज होता. हंगामाच्या सुरुवातीला गुळाला चांगली मागणी राहिल्याने दरही साडेचार हजारांपर्यंत कायम राहिला. हंगाम जसा पुढे गेला आणि आवक वाढत गेल्यानंतर दर खाली येऊ लागले. मात्र गेल्या आठवड्यापर्यंत सरासरी दर हा ४२०० रुपये क्विंटलपर्यंत होता. शुक्रवार (दि. ११) पासून तो चार हजार रुपयांच्या खाली येण्यास सुरुवात झाली. मंगळवारी २० हजार गूळरव्यांची आवक झाली आणि किमान दर ३७०५ रुपयांपर्यंत खाली आला. तर सध्याचा दर ३५००पर्यंत आला आहे.
गुळाची निर्यातही वाढणार
- ‘कोल्हापुरी’ गुळाला अमेरिका, लंडनसह आखाती देशात मागणी आहे. साधारणत: हंगामात एक टन गूळ निर्यात होतो. यंदा दर कमी असल्याने निर्यातही वाढेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
- साखरविरहित गुळाला मॉलमध्ये मागणीराज्यातील मॉलमध्ये साखरविरहित गुळाला चांगली मागणी आहे. नियमित गुळापेक्षा क्विंटलमागे दोनशे रुपये जादा दर मिळतो. या गूळ निर्मितीकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे.
- किलोच्या रव्याचा दर ३३०० रुपयाच्या खाली एक किलो गूळरव्यांची आवकही मोठ्या प्रमाणात होते. बाजार समितीत रोज १८ ते २० हजार बॉक्सची आवक होते. मात्र सरासरी दर प्रतिक्विंटल ३३०० रुपये राहिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
सौद्याचे नियोजनही विस्कटले
बाजार समितीत सौद्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्यानुसार एका लायसेन्सला आठ मिनिटे अशी सौद्याच्या कालावधीत २८ लायसेन्स व्हायची. मात्र अलीकडे वेळेचे नियोजन विस्कटल्याने व्यापाऱ्यांना ज्या दुकानातील माल घ्यायचा आहे, तिथेपर्यंत सौदाच न पोहोचल्याने गुळाची खरेदी होत नाही, हाही दर घसरण्यामागील एक कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.