कोल्हापूर- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक निवडणुकांमध्ये कागलमधील निवडणुकीचा समावेश होण्याची शक्यता आहे. शिवाय या निवडणुकीत आपला ऐतिहासिक विजय होऊन कागलमध्ये परिवर्तन करणार असल्याचे समरजितराजे घाटगे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.
कागलमध्ये माझा ऐतिहासिक विजय होणार- समरजित राजे घाटगे - samarjeet Raje Ghatge Vs Hassan Mushrif
मुश्रीफ यांनी १९९९ साली केलेल्या घोषणा आजही पूर्ण झाल्या नसून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या त्यावेळच्याच घोषणा असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने कागलमध्ये शाश्वत विकास झाला नसल्याची खंत यावेळी समरजितराजे घाटगे यांनी व्यक्त केली आहे.
कागलमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याने माझी नुरा कुस्तीसोबतच लढाई सुरू असल्याचे समरजित राजे घाटगे यांनी म्हटले आहे. समरजितराजे घाटगे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ उमेदवार आहेत. मुश्रीफ यांनी १९९९ साली केलेल्या घोषणा आजही पूर्ण झाल्या नसून प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या त्यावेळच्याच घोषणा असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने कागलमध्ये शाश्वत विकास झाला नसल्याची खंत सुद्धा यावेळी समरजितराजे घाटगे यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
हेही वाचा-किती बी ताण येत नाही बाण; अमोल कोल्हेचा शिवसेनेवर घणाघात