कोल्हापूर - शहरातील खराब रस्ते, नव्याने बांधायचे रस्ते आणि इतर समस्या युद्ध पातळीवर सोडवण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत आमदार चंद्रकांत जाधव यांनी विविध सुचना दिल्या आहेत. तसेच विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीत कोणतीही कमी पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही देखील दिली आहे.
'शहरातील नागरिकांना आणि वाहनधारकांना खराब रस्त्याचा प्रचंड त्रास होत आहे. यामुळे महानगरपालिकेने युद्ध पातळीवर या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम करणे आवाश्यक आहे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.' अशी ग्वाही काँग्रेसचे कोल्हापूर उत्तरचे नूतन आमदार चंद्रकात जाधव यांनी दिली. शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबतची आमदार चंद्रकांत जाधव यांनी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आणि अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी शहरामध्ये सध्या महापालिकेमार्फत सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामाची माहिती दिली. तसेच, शहरातील मुख्य रस्ते पॅचवर्क करण्यासाठी १ कोटी ६२ लाखाच्या कामाची निविदा १९ तारखेपर्यंत अंतिम होऊन लवकरच ही कामे सुरु केली जाणार असल्याचे सांगितले.