महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

100 एकर परिसरात कोल्हापुरात आयटी पार्कची निर्मिती करणार - कोल्हापुरात आयटी पार्क होणार

कोल्हापुरात आयटी पार्क व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. आता मात्र अनेक उद्योगांशी आमची चर्चा सुरू आहे. शिवाय लवकरच याबाबतचे करार सुद्धा करणार आहेत. मुंबई आणि पुण्यामधील हिंजवडीप्रमाणेच कोल्हापुरात सुद्धा भव्य आयटी पार्क करण्याबाबत जय्यत तयारी सुरू आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Feb 13, 2021, 4:22 PM IST

कोल्हापूर- कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवरच कोल्हापुरात भव्य आयटी पार्क करणार असून जवळपास 100 एकर जागेमध्ये हा आयटी पार्क उभा करणार आहे. आज यासंदर्भात उद्योजकांशी बैठक सुद्धा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापुरात आयटी पार्कची निर्मिती व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे उद्योजकांना तत्काळ जागा आणि सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोल्हापुरात आयटी पार्कची निर्मिती झाल्यास विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कागल तालुक्यात श्री अन्नपूर्णा साखर प्रकल्पाच्या पहिल्या गळीत हंगामाचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कोल्हापूर

अनेक उद्योगांशी चर्चा सुरू; लवकरच करार करणार
कोल्हापुरात आयटी पार्क व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. आता मात्र अनेक उद्योगांशी आमची चर्चा सुरू आहे. शिवाय लवकरच याबाबतचे करार सुद्धा करणार आहेत. मुंबई आणि पुण्यामधील हिंजवडीप्रमाणेच कोल्हापुरात सुद्धा भव्य आयटी पार्क करण्याबाबत जय्यत तयारी सुरू आहे. उद्योग आणि मोठ्या कंपनी नसल्यामुळे अनेकजण नोकरीसाठी परदेशात जातात मात्र त्यांना आता बाहेर जावे लागणार नाही, असे यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जे कोल्हापुरात बनते तो दर्जा इतरत्र मिळत नाही
कोल्हापूरमध्ये जे बनते त्याचा दर्जा इतरत्र कुठेही मिळत नाही, हा आपला लौकिक आहे. पहिली सहकारी वसाहत राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली होती. हाच वारसा आपल्याला अधिक पुढे नेण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही जोमाने प्रयत्न करत असून लवकरच कोल्हापुरात मोठ-मोठे उद्योग घेऊन येणार असल्याचेही सुभाष देसाई म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details