कोल्हापूर - गोवा येथील पथकाचे कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी आयसीजी चेतकच्या माध्यमातून कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. पाहणीनंतर भारतीय तट रक्षक दलाने समाधान व्यक्त केल्याचे विमानतळ प्राधिकरण संचालक कमल कटारिया यांनी सांगितले.
गतवर्षी आलेल्या महापुराच्या अनुषंगाने यंदाच्या पावसाळ्यात सर्व दक्षता पूर्ण असावी आणि बचाव कार्याची गरज पडली तर योग्य नियोजन असावे, याबाबत बैठक पार पडली. तसेच गोवा येथील पथकाचे कमांडंट अमित कोरगावकर आणि कमांडंट अशोक यादव यांनी आयसीजी चेतकच्या माध्यमातून कोल्हापूर, रत्नागिरी परिसराची आणि विशेष करून कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली.