महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राधानगरी येथील पडळी पुलावर मृतावस्थेत आढळला गवा - राधानगरी मृत गवा न्यूज

राधानगरीमध्ये मोठ्या प्रमाणात गवे आणि वन्य प्राणी आहेत. येथील गवे पर्यटकांचे खास आकर्षण ठरतात. हे गवे धरण आणि नदीकाठच्या आसपासच्या परिसरात वावरत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी नदी किनारी एक गवा मृतावस्थेत आढळून आला.

Indian bison
Indian bison

By

Published : Aug 7, 2020, 2:44 PM IST

कोल्हापूर - राधानगरी येथील पडळी पुलावर आज सकाळी एक मृत गवा आढळून आला आहे. नदी परीसरातील जंगल, ऊस शेतीमध्ये कदाचित हा गवा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राधानगरी परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात तो वाहून आला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राधानगरी हे अभयारण्य गव्यांसाठी ओळखले जाते. राधानगरीमध्ये मोठ्या प्रमाणात गवे आणि वन्य प्राणी आहेत. येथील गवे पर्यटकांचे खास आकर्षण ठरतात. हे गवे धरण आणि नदीकाठच्या आसपासच्या परिसरात वावरत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी नदी किनारी एक गवा मृतावस्थेत आढळून आला.

सध्या राधानगरी धरणाचे एकूण 4 दरवाजे उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अचानक नदीची पाणी पातळी वाढल्याने या प्रवाहातून तो वाहून आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहत येऊन तो गवा येथील पडळी पुलावर येऊन अडकल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांनी तात्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.

शुक्रवारी रात्री अचानक राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले आहेत. त्या 4 दरवाजांमधून जवळपास 5 हजार 600 क्यूसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच गवा वाहून येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे

ABOUT THE AUTHOR

...view details