कोल्हापूर- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवडे हे इचलकरंजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा परभव केला होता. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व भाजपला समर्थन दिले.
अपक्ष आमदार प्रकाश आवाडे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लागले होते. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत सरकार स्थापणेसाठी आपण भाजपला जाहीर पाठींबा देत असल्याचे प्रकाश आवाडे यांनी स्पष्ट केले. प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांचा पराभव केला होता.