कोल्हापूर - कोल्हापुरातल्या भुदरगड तालुक्यातील मेघोली येथील लघु पाटबंधारे तलाव फुटल्याची घटना काल 1 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तात्काळ या परिसराला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. शिवाय शेतीची मोठे नुकसान झाले असून, एका महिलेसह जवळपास 11 जनावरांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई बाबतच्या सूचना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
तलावाला आधीपासून गळती; स्थानिकांची जिल्हाधिकाऱ्यांना माहिती
मेघोली लघु पाटबंधारे तलावाला गेल्या अनेक दिवसांपासून गळती होती. याबाबत गावकऱ्यांनी संबंधितांना माहिती दिली होती. आज सकाळी जिल्हाधिकारी रेखावार यांनीही नुकसानीची पाहणी केली आणि इथल्या स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर नागरिकांनीही तलावाला गळती होती याबाबत माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आधीचे फोटो किंव्हा व्हिडिओ असतील तर द्यावेत असे आवाहन रेखावार यांनी केले आहे. दुर्दैवाने काल 1 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा तलाव फुटून परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शिवाय महिलेसह जवळपास 11 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.