महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur News: नोकरीवर सुट्टी घेऊन तरुण बसला रस्त्यासाठी उपोषणाला; शिरोळ तालुक्यातील घटना

ग्रामपंचायतने घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम केले नसल्याने इंजिनिअर तरुणाने उपोषणाला बसण्याचे पाऊल उचलले आहे. ही घटना शिरोळ तालुक्यातील आहे. या रस्त्यासाठी 24 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. परंतु रस्त्याचे काम सुरू झाले नाही. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

nandani village road uposhan
इंजिनिअर तरुणाचे आमरण उपोषण

By

Published : Feb 16, 2023, 1:48 PM IST

इंजिनीअर तरुण नोकरीवर सुट्टी घेऊन बसला रस्त्यासाठी उपोषणाला

कोल्हापूर: पुण्यातील नोकरीवरून सुट्टी घेत गावात येऊन त्याने उपोषण सुरू केले आहे. कोल्हापूरातल्या शिरोळ मधील नांदणी येथील हा इंजिनीअर तरुण आहे. रोहन रावसाहेब मगदूम असे याचे नाव आहे. रस्ता मंजूर होऊन अनेक दिवस झाले मात्र, कामाला अध्याप सुरुवात नसल्याने त्याने उपोषणाचे पाऊल उचलले आहे. आमदारांपासून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक आणि इतर सरकारी कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याने, तो गेले अनेक दिवस हैराण झाला होता. मात्र आता उपोषणानंतर तरी ते सर्वजण दखल घेतील अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.




म्हणून उचलले उपोषणाचे पाऊल : कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील बसवेश्वर मंदिर ते हुवाज मळा या 800 मीटर पानंद रस्त्यासाठी आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी 24 लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी मंजूर झाला असून रस्त्याचे काम मात्र अद्याप एक टक्के सुद्धा सुरू नाही. गेली 11 महिने रस्त्याचे काम मंजूर झालेले आहे मात्र, घराकडे जाणारा हा रस्ता मंजूर होऊन सुद्धा पूर्ण होत नसल्याने या गावातील तरुणाने उपोषणाचे पाऊल उचलले आहे.

रस्त्यावरून जाणे प्रचंड जिकिरीचे: 3 मे 2022 रोजी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत या पानंद रस्त्यासाठी 24 लाखांचा निधी मंजूर केला. याबाबत सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागाकडे वारंवार चौकशी केली. मात्र कामाला सुरुवात झाली नाही. याबाबत चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणे प्रचंड जिकिरीचे असते. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी या तरुणाने केली आहे. रोहन मगदूम यांनी म्हटले की, कोणत्याही परिस्थितीत शांत बसणार नाही , जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत आपण हे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्याने दिला आहे.


अमरण उपोषण केले होते: या आधीही अशीच एक अमरण उपोषणाची घटना घडली होती. मुंबईतील 13 जुलै 2011 मधील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नकी अहमद शेख यांनी खटल्याची सुनावणी लवकर सुरु करावी यासाठी न्यायालयातच अमरण उपोषण सुरु केले होते. या प्रकरणाला 11 वर्ष झाले तरी खटला जलद गतीने सुरु नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी जलद गतीने घ्यावी असे शेख यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात एटीएसने 2012 मध्ये शेक यांना अटक केली होती. या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात 27 लोकांचा मृत्यू तर, 130 हून अधिक जखमी झाले होते.

हेही वाचा: Shiv Sena Agitation Warned शिवसेनेचा आंदोलनातून इशारा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला राज्यपालांना बोलवू नका अन्यथा

ABOUT THE AUTHOR

...view details