महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 188 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया, तर 72 रुग्णांचा झाला मृत्यू - कोल्हापूर कोरोना परिस्थिती

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून आले. कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 333 रुग्ण आढळले आहेत. काही रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता ते रुग्ण एकदम बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, यामध्ये दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाहुयात कोल्हापुरमधील म्युकरमायकोसिस परिस्थितीचा आढावा घेणारा हा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट-

जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी
जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी

By

Published : Aug 16, 2021, 5:28 PM IST

Updated : Aug 16, 2021, 5:55 PM IST

कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव जस-जसा वाढू लागला, तस-तसे जिल्ह्यात म्युकरमायकोसिस रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून आले. कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल 333 रुग्ण आढळले आहेत. काही रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता ते रुग्ण एकदम बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, यामध्ये दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाहुयात कोल्हापुरमधील म्युकरमायकोसिस परिस्थितीचा आढावा घेणारा हा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट-

कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 188 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. तर, 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत ईटीव्ही भारतशी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी

'आत्तापर्यंत दाखल रुग्णांपैकी 203 रुग्ण बरे होऊन घरी परतले'

कोल्हापूरात म्युकरमायकोसिसचे आजपर्यंत एकूण 333 रुग्ण आढळले आहेत. या 333 रुग्णांपैकी एकूण 188 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, काहींवर योग्य औषधोउपचार केल्याने यातील 203 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. दुर्दैवाने, यातील 72 रुग्णांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

'इंजेक्शनसह मोठ्या प्रमाणात औषध पुरवठा; 11 रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत उपचार'

डोळ्यांसह, नाक आणि इतर भागावर थेट हल्ला करणाऱ्या बुरशीजन्य म्युकरमायकोसिस या आजारामुळे जिवालाही मोठा धोका आहे. कोरोना उपचारादरम्यान घेतलेली अति प्रमाणात स्टिरॉइड, टोसिलॅझुमॅबच्या अतिवापरामुळे हा आजार होत असल्याचे आरोग्य तज्ञांनी यापूर्वी सांगितले आहे. दरम्यान, कोल्हापूर जसे-जसे रुग्ण वाढू लागले तसे-तसे मोठ्या प्रमाणात औषध पुरवठाही करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात लागणारे औषधे, इंजेक्शन मिळणे अवघड झाले होते. मात्र, नंतर इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा करण्यात आला.

'शल्य चिकित्सक अनिल माळी यांनी दिली माहिती'

शल्य चिकित्सक अनिल माळी यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील विविध खाजगी आणि सरकारी 11 रुग्णालयात मोफत औषधोउपचार करण्यात आले आहेत. शिवाय आत्तापर्यंत इंजेक्शन एम्फोटेरेसिन-बी, टॅबलेट पोसोकोनेझोल मोठा पुरवठा करण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण 12 ते 15 हजार व्हायल शासनाने कोल्हापूर जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्या असून, आजही मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अनिल माळी यांनी दिली आहे. तसेच, यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्य झाल्याचही माळी म्हणाले आहेत.

Last Updated : Aug 16, 2021, 5:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details