महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात गव्यांचा कळप कालव्यात पडला - गव्यांचा कळप कालव्यात पडला

कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील उंदरवाडी गावाजवळील कालव्यात गव्यांचा कळप पडल्याचे आज पाहायला मिळाले. येथील उंदरवाडी ते बोरवडे परिसरादरम्यान हे गवे पाण्यात पडले.

गव्यांचा कळप कालव्यात पडला
गव्यांचा कळप कालव्यात पडला

By

Published : Jan 2, 2021, 6:54 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील उंदरवाडी गावाजवळील कालव्यात गव्यांचा कळप पडल्याचे आज पाहायला मिळाले. येथील उंदरवाडी ते बोरवडे परिसरा दरम्यान हे गवे पाण्यात पडले. पाणी पिण्यासाठी कालव्यामध्ये उतरल्यानंतर काही अंतरावर हे गवे वाहून जात होते. स्थानिकांनी कालव्याच्या बाजूला माती टाकल्याने गव्यांना बाहेर पडता आले आहे. जवळपास 10 ते 15 गव्यांचा कळप कालव्यामध्ये पडला होता. त्यातील 3 ते 4 गवे पाण्याच्या प्रवाहात पुढे वाहत गेल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. ही संपूर्ण दृश्ये त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केली आहेत. यावेळी परिसरातील नागरीकांनी कालव्यांच्या बाजुंनी मोठी गर्दी केली होती.

गव्यांचा कळप कालव्यात पडला


चार दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरात गवे पाहायला मिळाले -

चार दिवसांपूर्वी कोल्हापूर शहरातील काही भागांत सुद्धा 3 ते 4 गवे पाहायला मिळाले होते. वन विभागाच्या मदतीने त्यांना वन क्षेत्रात परतवून लावण्यात यश आले होते. खरंतर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गव्यांची संख्या आहेत. जिल्ह्यातल्या राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडीसह कागल तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात गवे पाहायला मिळत असतात.

हेही वाचा-सीरम पाठोपाठ भारत बायोटेकच्या लसीला मंजूरी मिळण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details