कोल्हापूर - कोल्हापुरात एका गायीने चक्क तीन वासरांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. शाहूवाडी तालुक्यातल्या सरूड गावातील शेतकरी विक्रम लाड या शेतकऱ्याच्या गायीने तीन वासरांना जन्म दिला आहे. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू असून अनेकजण सकाळपासून त्यांच्या घरी वासरांना पाहण्यासाठी गर्दी करत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
कोल्हापूरात गायीने दिला तीन वासरांना जन्म; सर्व सुखरूप - cow gave birth
शाहूवाडी तालुक्यातल्या सरूड गावातील शेतकरी विक्रम लाड या शेतकऱ्याच्या गायीने तीन वासरांना जन्म दिला आहे. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू असून अनेकजण सकाळपासून त्यांच्या घरी वासरांना पाहण्यासाठी गर्दी करत आश्चर्य व्यक्त करत आहेत.
एक तासाच्या अंतरात दिला 3 वासरांना जन्म -
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचा जोड धंदा म्हणून प्रत्येक घरात दुग्धव्यवसाय केला जातो. अनेकांकडे विविध जातीच्या गायी तसेच म्हैशी सर्रास पाहायला मिळतात. याच गाय तसेच म्हैशींनी अनेकदा दोन वासरांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावातील विक्रम लाड यांच्याकडे असलेल्या जर्सी गायीने चक्क तीन गोंडस वासरांना जन्म दिला आहे. लाड हे गेल्या अनेक वर्षांपासून दुग्धव्यवसाय करत आहेत. मात्र पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त करत आनंदही साजरा केलाय. कारण अशा घटना घडतात तेंव्हा अनेक वासरे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत मात्र विक्रम लाड यांच्या गोठ्यामध्ये जन्मलेली तीनही वासरे गोंडस आणि अगदी ठणठणीत आहेत. शिवाय गायीची प्रकृती सुद्धा ठीक असून एक एक तासाच्या अंतरात या तीनही वासरांना तिने जन्म दिला. या घटनेची माहिती मिळताच गावासह पंचक्रोशीतील लोकं लाड यांच्या घरी वासरांना पाहण्यासाठी येत आहेत.