महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुठल्याही परिस्थितीत शेट्टी आघाडीसोबत असले पाहिजेत - सतेज पाटील - says congress Mla satej patil

कुठल्याही परिस्थितीत राजू शेट्टी आघाडीसोबत असले पाहिजेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जागावाटपाबद्दल जी काही मागणी असेल त्यामध्ये तडजोड करून त्यांना सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे, असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले. येथील जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत असताना त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले मत मांडले.

कोल्हापूर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत आमदार सतेज पाटील

By

Published : Aug 31, 2019, 11:34 PM IST

कोल्हापूर - कुठल्याही परिस्थितीत राजू शेट्टी आघाडीसोबत असले पाहिजेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जागावाटपाबद्दल जी काही मागणी असेल त्यामध्ये तडजोड करून त्यांना सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे, असे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले. येथील जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत असताना त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले मत मांडले. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्वच नेते आता महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जात आहेत. त्या ठिकाणी ज्या पक्षांमध्ये खदखद असतील, काही चर्चा असतील तर त्या लवकरात लवकर संपवून आपल्याला पुढे जाणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा -VIDEO : राष्ट्रवादीचा आमदार.. करणार भाजपात प्रवेश अन् प्रचार गीत मनसेचे..!

पूर परिस्थितीमध्ये दहा दिवसांनी आम्हाला मदतीचा हात द्या, आमचे अश्रू पुसायचे काम करा, अशी विनंती आम्ही शासनाला केली होती. मात्र, दुर्दैवाने शासनाने अश्रू पुसण्याऐवजी कलम 144 लागू करत जमावबंदीचा आदेश या जिल्ह्यामध्ये दिला. लोकांनी घरातून बाहेर पडू नये, कारण मंत्र्यांना प्रश्न विचारले जातात. मंत्र्यांना प्रश्न विचारले जातात म्हणूनच जमावबंदीचा आदेश काढण्याचे पाप या सरकारने केले.

कोल्हापूर येथे शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत आमदार सतेज पाटील

सरकारच्या पापांचा घडा आता पूर्ण भरला आहे. तो घडा ओतला तर प्रचंड चुकीच्या गोष्टी या सरकारच्या काळांमध्ये झालेल्या आहेत. दुर्दैवाने त्या पोहोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलो, लोकांना सांगण्यापर्यंत आम्ही कदाचित कमी पडलो. मात्र, लोकांच्या मनामध्ये आता खदखद आहे. लोकांच्या मनामध्ये राग आहे. आता तो राग मतांमध्ये परिवर्तन कसा करता येईल आणि मताद्वारे काँग्रेसच्या पदरामध्ये कसा पाडून घेता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणे आता गरजेचे असल्याचे सुद्धा आमदार सतेज पाटील यांनी म्हणाले.

हेही वाचा -राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; आमदार राणा जगजित सिंह वडिलांसह करणार भाजपमध्ये प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details