कोल्हापूर - राज्यात गुटखा बंदी असतानाही बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 19 लाख 50 हजार रुपये किंमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 27 फेब्रुवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगली-कोल्हापूर बायपास मार्गावरील उदगाव गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. याबाबतच जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेकडून 19 लाखांचा गुटखा जप्त - कोल्हापूर पोलीस बातमी
सांगली-कोल्हापूर बायपास मार्गावर बेळगावहून येणाऱ्या गुटखा व सुगंधीत तंबाखूचा टेम्पो कोल्हापूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केला आहे. याबाबात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावहून पान मसाला, सुगंधीत तंबाखू आदी गुटख्याची वाहतूक होत आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. कारवाई करण्यात आली. याबाबत संशयित आरोपी म्हणून उदय दत्तात्रय माने (वय 53 वर्षे, रा. उमळवाड, तालुका शिरोळ, जि. कोल्हापूर) व स्वामी ( रा. अथणी, जि. बेळगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -कोल्हापूर विमानतळ : नाईट लँडिंगसाठी पुढील आठवड्यात दिल्लीमध्ये बैठक घेण्याचा निर्णय