महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहनधारकांनो मास्क वापरा, अन्यथा पंपावर मिळणार नाही इंधन - कोल्हापूर पट्रोल पंप बातमी

कोल्हापुरात वाहधारकाने जर मास्क घातला नसेल तर त्यांना पंपावर पेट्रोल, डीझेल किंवा गॅस मिळणार नाही.

पेट्रोल पंप
पेट्रोल पंप

By

Published : Oct 6, 2020, 4:32 PM IST

Updated : Oct 6, 2020, 5:10 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा प्रसार कमी व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नो मास्क, नो पेट्रोल, नो डिझेल आणि नो गॅस ही नवी चळवळ उभी केली आहे. तसे आदेशही त्यांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना दिले आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी

दरम्यान, आज शहरातील पेट्रोल पंपावर नो मास्क पेट्रोल, डिझेल, गॅसचे फलक झळकले. यामुळे जो ग्राहक विनामास्क पंपावर इंधन भरण्यासाठी येणार असेल त्याला आपल्या वाहनासाठी इंधन मिळणार नाही. अनेक पंपावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे फलक लावल्याने अनेकांनी त्यांचा निर्णयाचे स्वागत केले आहे.

हेही वाचा -कोल्हापुरात नाही पेट्रोल-डिझेल विक्रीत अनियमितता!

Last Updated : Oct 6, 2020, 5:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details