कोल्हापूर- कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करत ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले होते. 26 जुलै 1999 या दिवशी कारगिल युद्ध झाले होते. यंदा या विजयी दिवसाला 20 वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यामुळे या विजयी दिवसाची आठवण म्हणून राज्य सरकारकडून आज राज्यातील 460 चित्रपटगृहांमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजारहून अधिक विद्यर्थ्यांनी हा चित्रपट पाहिला.
कोल्हापुरात 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पाहिला 'उरी' चित्रपट - 10 हजार
कारगिल विजयी दिवसाची आठवण म्हणून राज्य सरकारकडून आज राज्यातील 460 चित्रपटगृहांमध्ये ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजारहून अधिक विद्यर्थ्यांनी हा चित्रपट पाहिला
![कोल्हापुरात 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी पाहिला 'उरी' चित्रपट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3955025-thumbnail-3x2-uri.jpg)
यामध्ये कोल्हापूर शहरातील 9 टॉकीजमध्ये 4 हजार 201 विद्यार्थी, इचलकरंजीतून 7 टॉकीजमध्ये 3 हजार 836 विद्यार्थी, जयसिंगपूर विभागात 2 टॉकीजमध्ये 621 विद्यार्थी, गढहिंग्लज विभागातून 2 टॉकीजमध्ये 862 विद्यार्थी, कुरुंदवाडमधील 1 टॉकीजमध्ये 283 विद्यार्थी, पेठवडगाव परिसरातील 2 टॉकीजमध्ये 569 विद्यार्थी असे एकूण 10 हजार 372 विद्यार्थ्यांनी हा सिनेमा पाहिला आहे.
सर्वच चित्रपटगृहांबाहेर मुलांनी चित्रपट पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत राज्यातील युवकांमध्ये देशाच्या सैन्याप्रती कर्तव्याची भावना आणि अभिमान वृद्धिंगत व्हावा, या करिता राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता.