कोल्हापूर- राज्य शासनाने जाहीर केलेल्या मिशन बिगिन अगेनच्या पाचव्या टप्प्यात आजपासून प्रतिबंधित क्षेत्र वगळता हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्यास सशर्त परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशान्वये ही परवानगी दिली आहे. त्यानुसार कोल्हापुरात बहुतांश हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस मालकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मिशन बिगीन अगेन: हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू... पण 'या' अटीवर - मिशन बिगिन अगेन कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यापासून गेल्या चार महिन्यापासून हॉटेल्स, लॉजिंग पूर्णपणे बंद होते. तर हा व्यवसाय ठप्प असल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले होते. सध्या देशातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकच्या टप्प्यात अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू...