कोल्हापूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज (शनिवारी) लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काही निर्णय हे स्वागतार्ह असले, तरीही काही निर्णयांवर मोदी सरकारवर टीका होत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी हा अर्थसंकल्प फसवा असून सरकारने अर्थसंकल्पात जुन्याच योजना नव्याने रंग लावून आणल्या असल्याची टीका केली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची केंद्रीय अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका... हेही वाचा... ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; मध्यमवर्गाला दिलासा
अर्थसंकल्पातून केवळ स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न - सतेज पाटील
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी जो अर्थसंकल्प जाहीर केला, तो अर्थसंकल्प हसवणारा आहे. यातून कोणालाही आधार मिळणार नसल्याची टीका सतेज पाटील यांनी केली. शिवाय जुन्या योजना नविन दाखवण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे. देशाचे आर्थिक नियोजन ढासळले असताना आणि उद्योगपतींची मोठे कर्ज थकीत असताना त्याबाबत कुठलाही निर्णय या अर्थसंकल्पात दिसत नाही. देशातील नागरिकांना केवळ सोळा-सतरा स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न यातून केला गेला असल्याची टीका पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा... एलआयसीमधील सरकारी हिस्सा विकणार - केंद्रीय अर्थमंत्री