कोल्हापूर - राधानगरी धरण परिसरात कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातून ७००० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सध्या कोल्हापुरात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनण्याची शक्यता, राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले
मध्यरात्रीपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढतच चालला असल्याने सध्या धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी सात नंतर धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. त्यानंतर रात्री ११.३० वाजता तिसरा दरवाजा उघडला. तर मध्यरात्री तीनच्या सुमारास चौथा दरवाजा उघडला
मध्यरात्रीपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढतच चालला असल्याने सध्या धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी सातनंतर धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. त्यानंतर रात्री ११.३० वाजता तिसरा दरवाजा उघडला. तर मध्यरात्री तीनच्या सुमारास चौथा दरवाजा उघडला.
परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणाच्या सर्व्हिस गेटमधून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोळी लोकांनी वेळीच स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या शहारासह इतर भागात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे. त्यामुळे कोल्हापुराला पुराचा मोठा धोका संभावतो आहे.