कोल्हापूर : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै रोजी 50 हजार रुपये जमा होणार होते. मात्र, अद्यापही ते शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 जुलै पासून 50 हजार रुपये जमा करण्यास सुरू करणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटले होते मात्र यानंतर राजकीय भूकंप घडला आणि सत्तेवर भाजप व शिंदे गटाची सत्ता आली यामुळे शिंदे यांनी तत्कालीन सरकारने घेतलेले सर्व निर्णयांना स्थगिती दिली. त्यामुळे पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा प्रस्तावास देखील स्थगिती मिळाली तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान अद्यापही मिळालं नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत.
आज छत्र्या घेऊन आलो आहे, उद्या याचेच भाले होतील-स्वाभिमानीकडून आज दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दसरा चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office Kolhapur) येऊन धडकला यानंतर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री साहेब ही पोकळ धमकी नाही, 10 वर्षांपूर्वी महामार्गावर काय झालं होतं ते पोलिसांना विचारून घ्या आज छत्र्या घेऊन आलो आहे, उद्या याचेच भाले होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे शेतीत काम केलेले फोटो सर्वांनी पाहिले आहेत.पण केवळ फोटो टाकू नका पहिल्यांदा आमचे पैसे द्या. शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील.उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला पण त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच निघून गेले.यामुळे आता निवेदनाची नाटकी करून काही होणार नाही.गेल्या वेळी देखील बैठकीला झाल्या त्यावेळी झालेल्या बैठकीतील पैशाचे काय झाले, त्या 135 रुपयांपैकी अजूनही पैसे मिळाले नाहीत असे सांगत आक्रमक पवित्रा घेतला आहे.