कोल्हापूर -हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारी रात्री कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे तसेच अनेक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचे घराचे छत उडून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोल्हापूर शहरामध्येसुद्धा सायंकाळी झालेल्या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. जवळपास अर्धा ते पाऊण तास कोल्हापुरात विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस सुरू होता.
मंगळवारीही कोल्हापुरात पावसाची हजेरी; पिकांचे मोठे नुकसान - कोल्हापुरात पावसाची हजेरी
मंगळवारी सुद्धा कोल्हापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
![मंगळवारीही कोल्हापुरात पावसाची हजेरी; पिकांचे मोठे नुकसान कोल्हापूर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-03:26:48:1618394208-mh-kop-02-rain-story-2021-7204450-14042021094714-1404f-1618373834-477.jpg)
पुढील दोन दिवस पावसाचा इशारा -
गेल्या एक आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हवामान खात्यानेसुद्धा पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह, पन्हाळा, राधानगरी, कागल, शाहूवाडी आदी भागात पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे कांदा, ज्वारी, फळबागांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुढचे दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी वीज कोसळल्याच्याही घटना घडल्या असून यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.