महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाचा कोल्हा'पुरात' कहर सुरूच; पूरस्थितीमुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद - belgaon

पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 बंद झाला आहे. त्यामुळे, कोल्हापूरचा मुंबई, पुणे आणि कोकणाशी संपर्क तुटला आहे. तसेच, बेळगाव आणि बंगळुरूशी देखील संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

heavy rainfall continues in kolhapur national highway number four blocked

By

Published : Aug 6, 2019, 10:29 AM IST

Updated : Aug 6, 2019, 11:06 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आता पुराचे पाणी शिरले आहे. शाहूपुरीमधील कुंभारगल्लीतसुद्धा दोनशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे. येथील सर्वच कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

पावसाचा कोल्हा'पुरा'त कहर सुरूच

पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बंद झाला आहे. त्यामुळे, कोल्हापूरचा मुंबई, पुणे आणि कोकणाशी संपर्क तुटला आहे. तसेच, बेळगाव आणि बंगळुरूशी देखील संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील राजाराम बंधाऱ्यांची पाणी पातळी 48 फूट 2 इंचावर गेली आहे. शिवाय, जिल्ह्यातील १०७ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर शहराप्रमाणेच, जिल्ह्यातील अनेक गावांत हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिर मार्ग आणि व्यापारी पेठेतसुद्धा काल दुपारच्या दरम्यान पाणी शिरले. अनेक ठिकाणी रस्ते खचण्याचे प्रकार सुरू आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर 2005 सारखीच परिस्थिती कोल्हापुरात निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : Aug 6, 2019, 11:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details