कोल्हापूर- हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी पावसाने अनेकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज रविवारी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास शहरातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू होता.
कोल्हापुरात मेघगर्जनेसह धुवांधार पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान - कोल्हापूर पाऊस अपडेट
गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. आज रविवारी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास शहरातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू होता.
कोल्हापूर
गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूरसह महाराष्ट्रात तीव्र उकाडा जाणवत होता. हवामान खात्याने सुद्धा दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह विविध ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार आज रविवारी रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.