कोल्हापूर- शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी (दि. 8 सप्टें.) सलग दोन तासांहून अधिक काळ ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक ओढ्यांनी रौद्ररूप धारण केले होते. यामुळे पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पावसाचे रौद्ररुप व बोलताना शेतकरी पन्हाळा तालुक्यात सुद्धा आजपर्यंत पाहिला नाही, असा दोन तास मुसळधार पाऊस मंगळवारी झाल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे. मागील एक आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, काल सायंकाळी अचानक पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना जिल्हाधिकारी पन्हाळगडावर जाणाऱ्या रस्त्यावरही पाण्याच्या लोंढ्यातून मोठ-मोठी दगड आल्याने काही काळ हा रस्ता बंद झाला होता. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. दरम्यान, विविध ठिकाणचा वीज पुरवठा सुद्धा काही काळ खंडित करण्यात आला होता.
दरम्यान, या पावसामुळे ओढ्याचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेताची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाहणी केली आहे.
हेही वाचा -'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट : बंद 18 व्हेंटिलेटर दुरुस्त करून कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू