कोल्हापूर - सध्या कोल्हापुरात लसीकरण संथगतीने सुरू असले तरी काही ठराविक केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालय समजल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयातच लसीकरणाचे नियम धाब्यावर बसवून लसीकरण सुरू आहे. नागरिकांची प्रचंड गर्दी, समन्वयचा अभाव, सोशल डिस्टन्सचा फज्जा, वशिलेबाजी या कारणांनी हे लसीकरण केंद्र चांगलेच गाजत आहे. अनेक नागरिक पहाटेपासून रांगेत उभे असूनसुद्धा त्यांना माघारी फिरावे लागते असल्याचे चित्र आहे.
सीपीआरच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी हेही वाचा -कोविड चाचण्यांसाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा - जिल्हाधिकारी देसाई
सीपीआर केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी
लसीचा अपुरा साठा असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील काही मोजक्याच लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस देण्याचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 250 पेक्षा अधिक लसीकरण केंद्रांवर लस दिली जात होती, मात्र अपुऱ्या लसीमुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे, ज्या लसीकरण केंद्रावर लस देण्यात येत आहे, त्या केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळत आहे. आज सीपीआर केंद्रावर हीच परिस्थिती पहायला मिळाली. लस घेण्यासाठी सीपीआर केंद्राबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीच यंत्रणा नाही.
..इतक्या जणांनी घेतली लस
कोल्हापूर जिल्ह्यात आज केवळ 4 हजार 870 लस शिल्लक आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ टक्के लोकांना लसीकरण झाले आहे. जानेवारी महिन्यात नऊ हजार जणांचे लसीकरण झाले. फेब्रुवारी महिन्यात तीस हजार जणांना लस देण्यात आली. मार्च महिन्यात 32 हजार 780 जणांचे लसीकरण करण्यात आले. तर, एप्रिल महिन्यापर्यंत सहा लाख 17 हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले, तर केवळ मे महिन्यात एक लाख 95 हजार लसीकरण पूर्ण झाले. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 12 लाख जणांचे लसीकरण झाले आहे. त्यातील पुरुषांची संख्या 5 लाख 97 हजार आहे. तर, 5 लाख 89 हजार महिलांनी लस टोचून घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 12 हजार नागरिकांनी कोविशिल्ड, तर 73 हजार जणांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे.
हेही वाचा -कोल्हापुरात पहिल्या, दुसऱ्या लाटेशी 64 गावांनी दिली फाइट