कोल्हापूर - जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील कोरोनाग्रस्ताच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे. रात्रंदिवस जीव धोक्यात घालून जे कोरोना योद्धे म्हणजेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्यांच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिणामी त्यांनी आता काम बंद आंदोलनाचे हत्यार उचलले आहे.
राज्यमंत्री यड्रावकरांच्या जिल्ह्यातच आरोग्य कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन - कोल्हापूर आरोग्य कर्मचारी आंदोलन बातमी
आरोग्य राज्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अशा प्रकारचे चित्र असल्याची ही गंभीर बाबत समोर आली आहे. एव्हढेच नाही तर येथील काही डाॅक्टर आणि नर्सही पाॅझीटिव्ह आले आहेत. असे असताना या स्टाफला ड्युप्यलिकेट मास्क, हॅन्डग्लोज मिळतात असा आरोप सुद्धा कर्मचारी यांनी केला असून त्यांनी काम बंद केले आहे.
दोन महिन्यांपासून पगार तर नाहीच शिवाय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरवले जाणारे मास्क, ग्लोज आदी गोष्टींसुद्धा मिळत नाहीयेत. त्यामुळे आजरा मधल्या कोरोना सेंटरमधील कंत्राटी कर्मचारी आणि डॉक्टरांनी आता कामबंद आंदोलन केले आहे. आरोग्य राज्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अशा प्रकारचे चित्र असल्याची ही गंभीर बाबत समोर आली आहे. एव्हढेच नाही तर येथील काही डाॅक्टर आणि नर्सही पाॅझिटिव्ह आले आहेत. असे असताना या स्टाफला ड्युप्यलिकेट मास्क, हॅन्डग्लोज मिळतात असा आरोप सुद्धा कर्मचारी यांनी केला असून त्यांनी काम बंद केले आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 हजार पार गेली आहे. शिवाय मृत्यूंची संख्या सुद्धा 1200 पार गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे.