हातकणंगले ( कोल्हापूर ) -येथील एका 61 वर्षीय सावकाराने अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना ( Hatkanangale Minor Girl Rape ) समोर आली आहे. हा नराधम पिडीतेचा मामा म्हणून वावरत होता. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी नंदकुमार चंद्रकांत निगवे याला ( Hatkanangale Police Arrested Criminal ) अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हातकणंगले येथील दर्गा चौक परिसरात नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. तो खाजगी सावकार असून, त्यामाध्यमातून त्याची पिडीत मुलीच्या कुटुंबाशी ओळख होती. तो पिडीत मुलीचा मानलेला मामा म्हणुन वावरत होता. याचाच गैरफायदा घेऊन त्याने मुलीच्या इच्छेविरोधात आपल्या नवीन बांधकामावरील पञ्याच्या शेडमध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केला.