महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन्यथा चंद्रकांत पाटलांवर फौजदारी खटला दाखल करणार - मुश्रीफ - hasan mushrif on patil

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकात पाटलांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी चुकून बोललो असे पाटील यांनी जाहीर करावे. तसेच मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अन्यथा फौजदारी खटला दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

hasan mushrif slams chandrakant patil over his statement in kolhapur
चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी अन्यथा फौजदारी खटला दाखल करणार - मुश्रीफ

By

Published : Aug 24, 2020, 4:40 PM IST

कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटलांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मी चुकून बोललो असेल पाटील यांनी जाहीर करावे. तसेच मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. अन्यथा फौजदारी खटला दाखल करणार असल्याचा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. माझ्यावर आरोप केवळ विरोधक म्हणून करण्यापेक्षा 'इधर उधर बाते मत करो, काफिला कैसे लुटा ये बताओ, असा टोला देखील मुश्रीफ यांनी पाटलांना लगावला आहे.

आर्सेनिक अल्बम औषध दोन रुपयाला मिळतो. पण जिल्हा परिषदेने यांची खरेदी 23 रूपयाला केली. यात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप चंद्रकात पाटलांनी केला होता. यावर मुश्रीफ म्हणाले, आयुष्य मंत्रालयाच्या शासन निर्णयाप्रमाणे आर्सेनिक खरेदी करण्याचा निर्णय घेतला व खरेदी प्रक्रिया सुरू केली. अपेक्षित दर न आल्यामुळे त्यांचा निर्णय रद्द करून जिल्हा पातळीवर घ्यावा, असे आदेश काढले. पण १५ दिवसांनी माहिती न घेता मुद्दाम माझी व माझ्या ग्रामविकास विभागाची बदनामी करण्याच्या उद्देशाने पाटील यांनी ग्रामविकास विभागाने २३ रुपये अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून भ्रष्टाचार केला व त्याच गोळ्या दोन रुपयांनी मी खरेदी करून कोथरूड मतदारसंघांमध्ये दिल्या आहेत, असे विधान केले.

हसन मुश्रीफ बोलताना...
तसेच १५ व्या वित्त आयोगाचा निधी ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के जिल्हा परिषद व १० टक्के पंचायत समिती यांना देण्याचा निर्णय मी घेतला होता. त्याप्रमाणे निधीचे वाटप झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी यांनी माझा सत्कार केला होता. त्यास उद्देशून पाटील यांनी हा तर केंद्र शासनाचा निर्णय असून मुश्रीफ हार कसे घालून घेत आहेत? असे कुत्सित विधान केले होते. मी वरील दोन्ही गोष्टीवरून त्यांना माफी मागण्याची विनंती केली होती व माफी न मागितल्यास त्यांच्यावर फौजदारी बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले होते. सर्वांचे पुरावे त्यांच्याकडे पाठवले होते. अद्याप त्यावर त्यांचे उत्तर आले नाही. तसेच त्यांनी माफीही मागितली नाही. याशिवाय मी त्यांना दोन रुपयाला अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदी करून द्याव्यात, असे आवाहन केले होते. यावरही त्यांचे उत्तर आलेले नाही, असे मुश्रीफ म्हणाले. पवार एके पवार म्हणणारा, मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे. सत्ता असली काय आणि नसली काय. मला फरक पडत नाही. ज्यावेळी परमेश्वराच्या कृपेने व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने सत्ता येते, त्यावेळी फक्त लोककल्याण व विकास हे दोनच माझ्या डोळ्यासमोर असतात, असेही मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान, महापुरानंतर अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कर्ज माफ करा अशी मागणी केली. मुळात महिलांना 24 टक्के व्याजातून कर्ज घेण्याची गरज का भासते? याचा अभ्यास करून अशा महिलांना मदत कशी करता येईल यासाठी अभ्यासगट तयार करणार आहे. त्यामध्ये वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असेल. त्यांनी सहा महिन्यांच्या आत अहवाल द्यायला लावून योग्य तो लवकर निर्णय घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details