महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आम्ही अशा शिव्या देऊ की विरोधकांना झोप लागणार नाही'...

गोपीचंद पडळकरांनी शरद पवरांवर केलेल्या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी उत्तर दिले आहे. आता यापुढे राज्यात निर्माण होणार परिस्थितीला विरोधी पक्षच जबाबदार असणार असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला आहे.

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

By

Published : Jun 28, 2020, 4:33 PM IST

Updated : Jun 28, 2020, 5:41 PM IST

कोल्हापूर - काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी उत्तर दिले आहे. दरम्यान, राज्यात शिव्या देण्याची मालिका सुरू झालेली असून आम्ही देखील अशा शिव्या देऊ की विरोधी पक्षाला झोप लागणार नाही. असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद

गोपीचंद पडळकरांवरांना प्रत्युत्यर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, 'देशाचे नेते शरद पवार यांच्यावर गोप्या ने जे विधान केले, त्याचा मी निषेध करतो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हेच गोप्याचे धनी आहेत.' असे सांगत, 'राज्यात शिव्या देण्याची मालिका सुरू झाली असून आम्ही देखील अशा शिव्या देऊ की विरोधी पक्षाला झोपा लागणार नाहीत'. असा इशारा देखील मुश्रीफ यांनी दिला आहे.

राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्य आणि शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यभरात पसरलेल्या संतप्त प्रतिसादावर बोलाताना मुश्रीफ म्हणाले, 'राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे'. असे सांगत, 'या परिस्थितीला पुर्णत: विरोधी पक्षच जबाबदार असेल', असे विधानही हसन मुश्रीफांनी यावेळी केले.

हेही वाचा -'शरद पवार म्हणजे राज्याला झालेला कोरोना'... आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली!

Last Updated : Jun 28, 2020, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details