कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेला निर्णय म्हणजे सर्वच ओबीसी समाजाचा विजय आहे. महाविकास आघाडीने ओबीसी अरक्षणाशिवाय ( OBC Reservation ) कोणतीही निवडणूक घ्यायची नाही अशी भूमिका घेतली होती. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही याबाबत पाठपुरावा केला होता. मात्र शिंदे गटाने बंड केले आणि आमचे सरकार कोसळले. त्यांचे सरकार आल्यानंतर त्यांना आमच्या काळातील आयोगाचा अहवाल प्राप्त झाला. तो त्यांनी कोर्टात सादर केला. त्यामुळे आम्ही सगळं जेवण बनवले आणि हे फक्त वाडपी असल्याची टीका मुश्रीफ यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर केली.
मी लोकसभा लढवणार नाही; पुन्हा विधानसभा-दरम्यान, हसन मुश्रीफ हे 2024 मध्ये लोकसभा ( Lok Sabha Elections 2024 ) लढवणार अशी चर्चा करत सुरू आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी लोकसभा लढवणार नाही. मी पुन्हा एकदा विधानसभेसाठी इच्छुक आहे. याला अजून बराच वेळ आहे. तोपर्यंत संजय मंडलिक यांचे ठाकरे यांच्यावर प्रेम आले आणि ते पुन्हा परत आले तर त्यांना उमेदवारी मिळेल. त्यामुळे बघू पुढे काय होते. त्याला अजून दोन वर्षे आहेत. असेही मुश्रीफ म्हणाले. त्यांनी यावेळी अधिवेशनात तरतूद केलेल्या कामांचा निधी रोखणे चुकीचे असल्याचेही म्हंटले. अलीकडे मंजुरी मिळालेल्या कामांना स्थगिती देणं समजू शकतो पण दोन वर्षांपूर्वीच्या कामांना स्थगिती का? असा सवाल सुद्धा मुश्रीफांनी उपस्थित केला.