कोल्हापूर - दूध उत्पादक आम्हालाच निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही दूध उत्पादकांना 85 ते 90 टक्के परतावा कसा देता येईल याबाबत प्रयत्न करू आणि तोच विश्वास गेल्या काही दिवसांपासून आम्ही दूध उत्पादकांना देत आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले. केवळ औपचारिकता बाकी असून विजय आमचाच असल्याचा विश्वास यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
राजू शेट्टी यांची भूमिका अनाकलनीय
काल (दि. 28 एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत असल्याची भूमिका जाहीर केली. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेट्टी यांच्या बाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, त्यांनी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याचे म्हटले. शिवाय अशोक चराटी यांनीही काल (बुधवार) सत्ताधारी गटासोबत असल्याचे जाहीर केले. याबाबत विचारले असता पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, चराटी यांच्यावर काही स्थानिक राजकारणामुळे दबाव टाकला असावा. शिवाय त्यांनी सुरुवातीला जाहीरपणे घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम राहतील, अशी खात्री असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले.
धनंजय महाडिकांसारखा खोटे बोलणारा माणूस या राजकारण नाही