कोल्हापूर - कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला. गुरुवारी पार पडलेल्या सौद्यात आंब्याच्या पेटीला चक्क ३० हजार रुपये भाव मिळाला आहे. गेल्या वर्षी मुहूर्ताच्या सौदयावेळी २५ हजार रुपये इतका दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षीचा दर आजवरचा सर्वात उच्चांकी ठरला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सौदा पार पडला.
कोल्हापुरात हापूस दाखल; पेटीला ३० हजार रुपयांचा उच्चांकी दर - कोल्हापूर आंबा न्यूज
गेल्या वर्षी आंब्याच्या पेटीला २५ हजार रुपये दर मिळाला होता. मात्र, यावर्षी विक्रमी ३० हजार रुपये दर मिळाला आहे.
![कोल्हापुरात हापूस दाखल; पेटीला ३० हजार रुपयांचा उच्चांकी दर कोल्हापुरात हापूस दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10593611-377-10593611-1613107715996.jpg)
आजवरची आंब्याला विक्रमी बोली
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारातील इम्रान बागवान यांच्या दुकानात देवगडमधील भाई आयरेकर आणि वासुदेव चव्हाण तसेच मालवनमधील सचिन गोवेकर या आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून (गुरुवारी) ४ डझन आंब्याच्या दोन पेट्या तसेच १ डझन चे १५ पेट्यांची आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील ही पहिल्या आंब्याची आवक आहे. दरवर्षी आंब्याच्या मुहूर्ताच्या सौदयाला चांगला दर मिळत असतो. गेल्या वर्षी आंब्याच्या पेटीला २५ हजार रुपये दर मिळाला होता. मात्र, यावर्षी विक्रमी ३० हजार रुपये दर मिळाला आहे. प्रसाद वळंजू यांनी उच्यांकी बोली लावली. तर जयवंत वळंजू यांनी ७ हजार रुपये दाराची बोली लावून १ डझन आंब्याचा बॉक्स खरेदी केला. दरम्यान आजवरच्या इतिहासात हा सर्वात उच्चांकी दर ठरला आहे.