कोल्हापूर - ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून एकत्र न येता यावर्षी 31 डिसेंबर आणि नुतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी याबाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.
New Year Celebration Rules Kolhapur : 31 डिसेंबर साजरा करताय? कोल्हापूरकरांनो, मग आधी ही नियमावली वाचा... - 31 डिसेंबर नियमावली कोल्हापूर जिल्हा प्रशासन
ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून एकत्र न येता यावर्षी 31 डिसेंबर आणि नुतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
31 डिसेंबर साजरा कोल्हापूर
31 डिसेंबर साजरा करण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे,
- कोरोनाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर रोजी व दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
- रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, या आदेशाचे पालन करण्यात यावे.
- 31 डिसेंबर आणि नूतन वर्ष 2022च्या स्वागताकरीता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या 25 टक्केच्या मर्यादित उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
- याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंग राखले जाईल तसेच मास्क् व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.
- त्याठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.
- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.
- 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी बागेत, रस्त्यावर,समुद्र किनारी, अशा सार्वजनिक ठिकाणी मोठया संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग राहील तसेच मास्क व सॅनिटाझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.
- नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
- नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
- फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
हेही वाचा -Year Ender Business 2021 : सरत्या वर्षातील 'या' आहेत व्यापारविषयक महत्त्वाच्या घडामोडी
Last Updated : Dec 31, 2021, 6:50 AM IST