महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 4, 2022, 11:05 AM IST

ETV Bharat / state

Governor of Karnataka : कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; आज कोश्यारी यांच्यासोबत कोल्हापूरात महत्वपूर्ण बैठक

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत ( Governor of Karnataka Thawarchand Gehlot ) आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन ( Darshan of Karveer resident mother Ambabai) घेतले.

Governor of Karnataka
कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत ( Governor of Karnataka Thawarchand Gehlot ) आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन ( Darshan of Karveer resident mother Ambabai ) घेतले. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. सहपरिवार ते अंबाबाई मंदिरात सकाळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत माहिती देखील जाणून घेतली. यानंतर ते आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्यासोबत असलेल्या बैठकीस्थळी निघाले आहेत.

कर्नाटकच्या राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन



कोल्हापूरात महत्वपूर्ण बैठक :सीमाभागातल्या प्रश्नांबाबत आज कोल्हापूरमध्ये मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत तसेच सीमाभागातील दोन्ही राज्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहराला छावणी चे स्वरूप प्राप्त झाले असून शहरात ठीक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या बैठकीच्या माध्यमातून अनेक दशकांपासून सुरू असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नावर तोडगा निघणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.



बैठकीत या विषयांवर होणार चर्चा :रेसिडेन्सी क्लबमध्ये सकाळी ११ ते १ या वेळेत होणाऱ्या बैठकीत या भागांतील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही राज्यांकडून केला जाणार आहे. अलमट्टी धरणाचा फटका कोल्हापूर आणि सांगलीला पुरामुळे बसतो, याधरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने पुढे आणला आहे. मात्र याला महाराष्ट्र सरकारने तीव्र विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराला कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी, आजरा तालुक्यातील किटवडे प्रकल्प, गोवा राज्यातून अवैध पद्धतीने होणारी दारू वाहतूक, लम्पी रोग, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे दाखले, कर्नाटकातून येणारे हत्ती, कोरोना काळातील अनुदान, गर्भलिंग निदान चाचणी अशा विविध समस्यांसंदर्भात या विषयावरही बैठकीत चर्चा होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details